शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:50+5:302021-08-20T04:34:50+5:30

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नावाचे स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वापरता येईल, असे ...

Farmers in Shahada taluka will be able to inspect e-crops | शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नावाचे स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वापरता येईल, असे हे ॲप्लिकेशन असून, अँड्रॉइड मोबाइलवर याचा वापर सहजरित्या शक्य आहे. या ॲपवर आपली माहिती भरून नोंदणी केल्यावर एक संकेतांक प्राप्त होईल. त्यानंतर आपल्या शेतावर जाऊन पिकाच्या फोटोसह क्षेत्र, पिकाचे नाव, सिंचन पद्धती इत्यादी माहिती भरून साठवायची आहे. एका नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून वीस खातेदारांची पीक पाहणी नोंदवता येईल. त्यामुळे स्मार्ट फोन नसल्यास चिंतेचे कारण नाही. कुठलीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप हंगामाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असली तरी ३१ ऑगस्टपावेतोच आपली पीक पाहणी नोंदवावी. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ॲपचा लाभ घेत आपल्या शेतातील पीक पाहणी स्वतः करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Farmers in Shahada taluka will be able to inspect e-crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.