ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी वा:यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:17 IST2019-11-26T12:17:41+5:302019-11-26T12:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट पोर्टलद्वारे नोंदणी करणा:या शेतक:यांना मान्यता देण्याचे प्रलंबीत असतांना आधार ...

ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी वा:यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट पोर्टलद्वारे नोंदणी करणा:या शेतक:यांना मान्यता देण्याचे प्रलंबीत असतांना आधार क्रमांक दुरूस्तीअभावी हजारो शेतकरी या योजनेपासून वंचीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन्ही बाबींसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतक:यांची सामाईक सुविधा केंद्रांवर गर्दी होत आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता सरसकट सर्व शेतक:यांना लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची माहिती आधार संलगA करण्यात येत असून त्यानंतरच शेतक:यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. परंतु अनेक शेतक:यांचे आधार क्रमांक चुकीचे, नाव चुकीचे, गट क्रमांक आणि क्षेत्र चुकीचे असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एम.किसान या पोर्टलवर अनेक दिवसांपासून ठराविक शेतक:यांचीच नावे दिसून येत आहेत. अनेक पात्र लाभार्थी शेतक:यांची नावेच या पोर्टलवर येत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये संभ्रमावस्था आहे. आता 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदत असल्यामुळे शेतक:यांची धावपळ उडाली आहे.
सर्व हप्ते आधारलिंकच
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक:यांना मिळणारे सर्व अर्थात तिन्ही हप्ते हे आधार लिंक राहणार आहेत. त्यासाठी पात्र शेतक:याची सर्व माहिती आधारकार्ड आधारीत असावी ही प्रमुख अट होती. परंतु अनेक शेतक:यांचे आधार लिंक नसणे, आधारकार्ड क्रमांक चुकीचा असणे, नावात चूक असणे यासह इतर अडचणी आहेत. त्या दुरूस्तीसाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ऑनलाईन पोर्टल
थेट नोंदणी करणे किंवा माहितीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी शासनाने एम.किसान पोर्टल सुरू केले आहे. त्यात ऑनलाईन नोंदणी व दुरूस्तीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या करूनही अनेक शेतक:यांची नावेच संबधीत गावांच्या यादीत दिसून येत नसल्याच्या शेतक:यांच्या तक्रारी आहेत.
ज्या शेतक:यांच्या नोंदी झालेल्या आहेत, परंतु त्रुटी असतील त्या शेतक:यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठविला जात आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना देण्यात आलेल्या गावांमध्ये त्यांच्या अधिनस्त असलेल्या सामाईक सुविधा केंद्रात शेतक:यांचे आधारकार्ड लिंकिंग व सुधारीत माहिती पुरविण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.
ज्या शेतक:यांची नोंदणी झालेली नाही परंतु पात्र असतील अशा शेतक:यांना थेट नोंदणी करण्यासाठी पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 446 शेतक:यांनी नोंदणी केली होती. पैकी केवळ 18 शेतक:यांना मान्यता देण्यात आली. एका शेतक:याची नोंदणी रद्द करण्यात आली. तर 427 शेतक:यांची मान्यता प्रलंबीत आहे.
पाच दिवसांची मुदत
नोंदणी व माहिती दुरूस्तीसाठी आता केवळ पाच दिवसच शिल्लक आहेत. परंतु अनेक शेतक:यांची नावे यादीत आलेली नाहीत.
नोंदणी करूनही आणि माहितीत दुरूस्ती करूनही नावे नसल्यामुळे या योजनेपासून अनेक पात्र शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेवटच्या पाच दिवसात संबधीत गावातील तलाठींनी पात्र शेतक:यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक:यांमध्ये सर्वात कमी वर्धा तर सर्वात जास्त बीड जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात 188 शेतक:यांनी नोंदणी केली आहे. बीड जिल्ह्यात 10,896 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातून 446 शेतकरी, धुळे जिल्ह्यातून 353 तर जळगाव जिल्ह्यातून 2,179 शेतक:यांची नोंदणी करण्यात आली आहे. पोर्टलवर थेट नोंदणी केलेली असल्याने केंद्र शासनास व राज्य शासनास शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. शिवाय तलाठी देखील गावागावात टार्गेट होत असल्याचे चित्र आहे.