नंदुरबारात शेतकरी अपघात विमाची कागदच सापडेना.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:00 IST2018-05-22T13:00:32+5:302018-05-22T13:00:32+5:30
सावळा गोंधळ : कृषी विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

नंदुरबारात शेतकरी अपघात विमाची कागदच सापडेना.
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार येथील जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची नावे, संख्या तसेच योजनेसंदर्भातील कागदपत्र सापडेनासे झाले आहेत़ त्यामुळे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणारा राज्य कृषी विभाग आपल्या सावळ्या गोंधळाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आह़े
राज्य शासनाकडून साधारणत 2006-2007 साली शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरु करण्यात आली आह़े त्यामाध्यमातून अपघातग्रस्त शेतक:यांना तसेच मृत्यूमुखी पडलेल्या शेतक:यांच्या वारसांना या माध्यमातून तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे योजनेची फाईलच मिळत नसल्याचे उघड झाले आह़े
त्यामुळे शेतक:यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवूण देणारा राज्य कृषी विभाग शेतक:यांप्रती किती संवेदनशिल आहे, याचाच प्रत्येय यामाध्यमातून येत आह़े कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला नेहमी तोंड देण्या:या शेतक:यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महत्वकांक्षी अशी शेतकरी अपघात विमा सुरु करण्यात आली आह़े परंतु कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना अजूनही शेतक:यांपासून कोसो दूर आह़े जिल्ह्यातील किती शेतक:यांनी योजनेचा लाभ घेतला, मृत्यूनंतर किती शेतक:यांच्या वारसांना योजनेअंतर्गम मदत झाली, याचा कुठल्याही प्रकारचा तपशील कृषी विभागाकडे नाही़ त्यामुळे सर्वसामान्य शेतक:यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना कृषी विभागाकडून अशा प्रकारे चालढकल करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होतेय