महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:08+5:302021-09-10T04:37:08+5:30
लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत नवापूर : तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी ...

महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत
नवापूर : तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे. काहींची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली. मात्र, त्यांच्या खात्यात पैसेच जमा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरूस्ती करा
तळोदा : जिल्ह्यातील काही गावातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांना झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो.
पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
शहादा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे; तरी नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तरी संबंधितांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आधारकार्ड देण्याची मागणी
अक्कलकुवा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक नागरिकांना अद्याप आधारकार्ड प्राप्त न झाल्याने त्यांंना विविध सोई सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. आता सर्व शासकीय कामात आधारकार्ड सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, दुर्गम भागातील नागरिकांना शहरात आल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शिबिर राबविण्याची मागणी होत आहे.