Farmers expressed displeasure during the inspection | पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यात वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, गटविकास अधिकारी अशोक पटाईत व कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पंचनामे झाले नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली़
नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांच्या कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीची पाहणी सभापती गावीत यांनी अधिकाºयांसोबत केली़ तालुक्यातील सुजालपुर, बोराळा, खापरखेडा, समशेरपुर, विखरण, हाटमोहिदा, नाशिंदे या गावांच्या शेतशिवारातील ऊस, कापूस, मिरची, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचा आढावा प्रसंगी घेण्यात आला़ यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, शांताराम पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस रोहिदास मराठे, प्रल्हाद पटेल, सरपंच बाळासाहेब मोरे, पंचायत समिती सदस्य मंगलसिंग माळी,उमाकांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पदाधिकारी व अधिकाºयांकडून पाहणी सुरू असताना शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत पाहणी नको प्रत्यक्ष मदत करा अशी मागणी केली़ नुकसान झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी आलेच नसल्याचे शेतकºयांनी सांगितले़ शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आर.एम पवार, मंडळ अधिकारी विजय मोहिते यांना पंचनामे करण्याबाबत विचारणा केली़

सुजालपुर येथील प्रकाश पाटील, समशेरपुर येथील हिरालाल सुदाम पाटील, बोराळे येथील सुभाष भिल, नाशिंदे गावातील छबीलाल श्रीराम पाटील, गणेश भटू पाटील, खापरखेडा येथील दुला ठाकरे यांच्या शेतशिवारातील नुकसानीची पाहणी पदाधिकारी व अधिकाºयांनी केली़ मिरची व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे़ बºयाच ठिकाणी शेतांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे यावेळी दिसून आले़ प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी या पाहणीदरम्यान शेतकºयांनी लावून धरली़

Web Title: Farmers expressed displeasure during the inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.