ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने घेतले झेंडूचे विक्रमी उत्पन्न नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:05 IST2020-11-14T12:05:46+5:302020-11-14T12:05:58+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीतून अवघ्या तीन महिन्यात विक्रमी उत्पन मिळविले ...

ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने घेतले झेंडूचे विक्रमी उत्पन्न नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयोग
n लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीतून अवघ्या तीन महिन्यात विक्रमी उत्पन मिळविले आहे. अर्धा एकर क्षेत्रात झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. या लागवडीतून मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले निघत आहेत.
आपल्या अर्धा एकर क्षेत्रात झेंडूची लागवड करून व्यापाऱ्यांना विक्री करून थेट शेतात झेंडूच्या फुलांची शंभर रुपये प्रती किलो विक्री होत असून झेंडूची फुले तोडणीदेखील सुरू आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेत पीक शेतातच पडून आर्थिक नुकसान झाले. त्यात काही शेतकऱ्यांनी झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी युक्ती वापरून पिकांची लागवड करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी हर्षल शरद पाटील या शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. यात त्यांना विक्रमी उत्पन्न मिळत असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला थेट शेतातच फुलांची विक्री करण्यात येत आहे.