शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
2
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
3
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
4
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
5
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
6
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
7
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
8
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
9
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
10
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
11
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
12
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
13
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
14
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
15
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
16
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
17
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
18
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
19
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
20
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

खतांच्या खरेदीसाठी शेतक:यांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:47 PM

खतांचा तुटवडा : खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्याने खतसाठा वाढविण्याची मागणी

शहादा : तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी समाधान कारक पाऊस झाला असून, सध्या रासायनिक खतांचा तुटवडा  जाणवत असून, एका खाजगी दुकानदाराकडे खत उपलब्ध झाल्याने शेतक:यांनी खत खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या वेळी खताचासाठा वाढविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत           आहे.पावसाळा सुरू होवून दीड-दोन महिने पूर्ण होत आले. तालुक्यात सरासरी 142.78 मिलि मीटर पावसाची नोंद झाली असून, गत वर्षाच्या तुलनेत जुलै अखेरपेक्षा सुमारे 45.56 मिलि मीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.खरीप हंगाम सुरू असल्याने शेतक:यांनी कापूस, मूग, मका, ज्वारी, बाजरी, केळी व पपई आदी पिकांची लागवड केली आहे. पीक लागवड करून महिने-दीड महिन्याचा कालावधी लोटला असल्याने  निंदणी, कोळपणीची कामे शेत शिवारात झाल्याचे दिसून येते.  तुरळक पावसामुळे सध्या पीक तगधरून आहेत.पिकांची वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यासाठी युरीया, पोटॅश,  अशा विविध महत्त्व पूर्ण खतांचा तुटवडा सध्या जाणवत आहे.  गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शेतकरी रासायनिक खतांसाठी  कृषी केंद्रावर भटकंती करीत आहे. कृषी केंद्रावर माल नसल्याने शेतक:यांना परत फिरावे लागत  आहे.दरम्यान मोजक्या काही कृषी केंद्रांवर रासायनिक खतांचा साठा करीत शेतक:यांना वेठीस धरले जात आहे. अल्पभूधारक सामान्य शेतक:यांच्या शेतीसाठी रासायनिक खत वेळेवर न मिळाल्यास पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन प्रकाशा रोडवरील खत विक्रेत्याकडे युरीया खत उपलब्ध झाल्याने शेतक:यांनी पहाटेपासूनच खत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यात महिलांचीही लक्षणिय गर्दी दिसून आली. दरम्यान संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.