शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडीवर अळ्यांच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:55 IST

सोमावल परिसर : उत्पन्नात घट होणार, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडीचे पीक काढणीवर आले असून अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आहे.परिसरात मागील काही वर्षापासून बहुतेक शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत आहेत. येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाला मागणी आहे त्याच पिकाची लागवड करण्यावर भर देतात. एरंडीला तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्यात मोठी मागणी असते. त्यामुळे याठिकाणी या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परिसरातील काही प्रयोगशील शेतक:यांनी मागीलवर्षी लागवड केलेल्या एरंडी पिकाच्या झाडावरील आजूबाजू वाढलेल्या  फक्त फांद्या तोडून पीक तसेच राखून ठेवले. परिणामी कमी खर्चात  पिकाची जोमदार वाढ होऊन मागील वर्षाच्या निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुरवातीपासूनच         पहिल्या वर्षापेक्षा जास्त प्रमाणात लागलेली एरंडी यामुळे उत्पादनात तीन ते चार पट वाढ होण्याची  शक्यता आहे. परिपक्व पिकांची आतापासूनच काढणी सुरु             झाल्याने प्रयोगशील शेतकरी आनंदात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पिकावर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे शेतकरी  पुरता हवालदिल झाला आहे. परिसरात सर्वाधिक पीक एरंडीचे घेतले जात असल्याने अळ्यांमुळे  मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या अळ्यांचे पिकाच्या पानांवरच आक्रमण होत आहे. अळ्या संपूर्ण पान हळूहळू खाऊन टाकत असल्याने पीक निरूपयोगी ठरत आहे. विशेषता पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकाची पाने कोरडी पडत असून ऐन वाढीच्या व फळधारणेच्यावेळी अशाप्रकारे अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतक:यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.