डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:38+5:302021-06-09T04:38:38+5:30

शेती मशागतीची कामे लवकर व्हावीत यासाठी आता शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व कामे करण्यावर भर देतात. त्यातच प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीचे ...

Farmers angry over rising diesel prices | डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

शेती मशागतीची कामे लवकर व्हावीत यासाठी आता शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व कामे करण्यावर भर देतात. त्यातच प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने बैलजोडीचा वापर करणे परवडत नाही. एका बैलजोडीची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र माणसाची गरज असते. त्यामुळे नांगरटी, खते टाकणे, पेरणी आदी शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. सर्वच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसले तरी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही असे शेतकरी भाडे देऊन ट्रॅक्टरद्वारे कामे करून घेतात. त्यामुळे वेळेचीही बचत होते; मात्र डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करुन देणाऱ्या व्यावसायिकांनीही दर वाढवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देऊन मशागतीची कामे करुन घ्यावी लागत आहेत. शासनाने शेतीच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Farmers angry over rising diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.