कृषीदूतांकडून शेतक:यांना लष्करी अळीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:28 IST2019-07-23T12:27:59+5:302019-07-23T12:28:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त होत होती़ अळीचा ...

Farmers: From agriculturalists to military guidance | कृषीदूतांकडून शेतक:यांना लष्करी अळीबाबत मार्गदर्शन

कृषीदूतांकडून शेतक:यांना लष्करी अळीबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त होत होती़ अळीचा नाश करण्यासाठी तालु्क्यात कार्यानुभव उपक्रमासाठी आलेल्या कृषीदूतांनी शेतक:यांना मार्गदर्शन करत उपाययोजना सुचवल्या़
धडगाव तालुक्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने शेतक:यांनी मका आणि खरीप ज्वारीचा पेरा केला आह़े दरम्यान काही दिवसांपासून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता़ यातून मार्ग कसा काढावा अशा चिंतेत असताना कृषी कार्यानुभव कार्यक्रसाठी शहादा येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत आले होत़े त्यांनी या समस्येवर शेतक:यांसोबत संवाद साधत खरवड येथे शेतक:यांना मार्गदर्शन केले. विद्याथ्र्यानी लष्करी अळीचा प्रादुर्भाव, त्याचे जीवनचक्र, त्याचप्रमाणे पिकांवर जाणवणारी लक्षणे व त्यावरील उपाययोजना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन उपाय सुचवल़े परेश पालीवाल, कार्तिक सोनवणे, शाहरुख पिंजारी, चेतन माळी, प्रदीप जाधव, अकुला हेमंत या विद्याथ्र्यानी शेतक:यांसोब संवाद साधला़ 
तालुक्यात अनेक भागात सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Farmers: From agriculturalists to military guidance