शेतीच्या जुन्या वादातून अक्कलकुवा येथे जमावाकडून चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:58 IST2018-03-05T12:58:58+5:302018-03-05T12:58:58+5:30

पावणे तीन लाखांचा ऐवजही लुटला

A farmer's agitation in Akkalkuwa assaulted the four people | शेतीच्या जुन्या वादातून अक्कलकुवा येथे जमावाकडून चौघांना मारहाण

शेतीच्या जुन्या वादातून अक्कलकुवा येथे जमावाकडून चौघांना मारहाण

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : जमिनीच्या जुन्या वादातून राजमोही ता़ अक्कलकुवा येथील जमावाने अक्कलकुवा येथील चौघांना बेदम मारहाण करत पावणे तीन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला़ ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली़ 
अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्याचे विक्रेते महावीर राणुलाल डागा व त्यांचे भाऊ गौतमचंद राणुलाल डागा यांचा शब्बीर फत्ते मोहंम्मद यांच्यासोबत शेतीवरून वाद सुरू आह़े शनिवारी महावीर डागा हे त्यांच्या भावाच्या पूनम मेडिकल या दुकानात बसले असताना, त्याठिकाणी शब्बीर फत्तेमोहम्मद, इरफान शब्बीर मक्राणी, अजिज फत्तेमोहंमद मक्राणी, हारून हकीम मक्राणी, मुस्तफा इब्राहिम मक्राणी, अब्दुल मन्नान नजीम मक्राणी, फिरोज मेकॅनिकल, नजीम इब्राहिम मक्राणी, मुश्ताक अली शौकत अली मक्राणी  यांच्यासह 10 जणांनी येऊन तोडफोड करण्यास सुरूवात केली़ संशयितांनी अचानक दगड-विटांचा मारा करण्यास सुरवात केल्याने या भागात एकच घबराट पसरली़ तोडफोडीदरम्यान संशयित आरोपींनी महावीर डागा, दिलीप सूरजमल डागा, राहुल आणि गौतमचंद जैन यांना मारहाण करत दुकानातील 80 हजार रोख, डागा यांची 1 लाख 20 हजार रूपयांची 4 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 45 हजार रूपये किमतीच्या दीड तोळे वजनाच्या अंगठय़ा असा एकूण दोन लाख 45 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेल्या़ 
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत व पोलीस निरीक्षक क़ेजी़पवार यांनी घटना स्थळावर भेट देत, परिस्थिती नियंत्रणात आणली़ याबाबत महावीर डागा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात 18 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े 

Web Title: A farmer's agitation in Akkalkuwa assaulted the four people