कॅांग्रेसच्या किसान बचाव रॅलीत २२५ ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:28 IST2020-11-10T12:28:11+5:302020-11-10T12:28:18+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे किसान बचाव रॅली काढण्यात आली. ...

कॅांग्रेसच्या किसान बचाव रॅलीत २२५ ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे किसान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. २२५ ट्रॅक्टरची रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शहरातील वळण रस्त्यावरून या रॅलीला सुरुवात झाली. वाघेश्वरी चौफुली, धुळेनाका, नाट्यगृह, दिनदयाल चौक मार्गे रॅली काढण्यात आली. या रॅलीत २२५ शेतकर-यांनी ट्रॅक्टर सहभागी केले होते. त्यांना केळी, ऊस, कापूस, ज्वारीचे ताटे लावून शेतीमध्ये असलेली वस्तूस्थिती प्रदर्शीत केली. केंद्र शासन जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे मागे घेत नाही. कामगार विरोधी कायदे रद्द करीत नाही तोपर्यंत जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री पाडवी यांनी सांगितले.
या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल, व्यापा-यांचा त्यात फायदा आहे. कामगारांच्या विरोधात कायदे करून उद्योजकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काॉंग्रेस त्याला पुर्ण ताकदीने विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीने केंद्र सरकारच्या विरोधातील असंतोष दिसून आला. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
रॅलीत आमदार शिरिष नाईक, जिल्ह्याचे प्रभारी पानगव्हाणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, काॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, पदाधिकारी विश्वास पाटील, किसान सेलचे अशोक पाटील, कॅांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष नरेश पवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश चौधरी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.