शेतक:यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:27 IST2019-11-04T13:27:34+5:302019-11-04T13:27:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी ...

शेतक:यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी केली आह़े गावीत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिल़े
निवेदनात नवापुर तालुक्याच्या विविध भागात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी तर गेल्या दोन आठवडय़ात अवकाळी पाऊस झाला आह़े यातून तालुक्यातील 27 गावांमधील भात, कापूस, मका, सोयाबीन विविध पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े गावांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाने गांभिर्याने पंचनामे करुन शेतक:यांकडून माहिती जाणून घ्यावी तसेच नुकसानीची भरपाई तालुक्यातील शेतक:यांना तातडीने द्यावी अशी मागणी भरत गावीत यांनी केली आह़े मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिले आह़े