शेतक:यांच्या डोक्यावर 95 लाखांचे कर्ज उभे करून संस्था झाली पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:22 IST2019-09-09T12:22:01+5:302019-09-09T12:22:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतक:यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून खडकी, ता.मालेगाव येथील संस्थेने पोबारा केला. तब्बल 95 ...

शेतक:यांच्या डोक्यावर 95 लाखांचे कर्ज उभे करून संस्था झाली पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतक:यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून खडकी, ता.मालेगाव येथील संस्थेने पोबारा केला. तब्बल 95 लाख 50 हजारांचे कर्ज आता शेतक:यांना फेडावे लागणार आहे. शेतात पॉली हाऊस करून देण्याच्या बहाण्याने हे कर्ज प्रकरणे संबधीत संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवापूर शाखेचे तत्कालीन अधिका:यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा शेतक:यांचा आरोप आहे.
नवापुरातील पुष्पा गिरीश गावीत या शेतकरी महिलेसह आणखी दोन शेतक:यांना शेतात पॉली हाऊस बांधून देतो असे अमिष खडकी, ता.मालेगाव येथील तिरुपती इरिगेशन संस्थेचे संचालक नंदराज देवरे यांनी दिले. त्यासाठी बँकेतून कर्ज देखील मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. शेतक:यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून बँकेत कर्ज प्रकरणे केली. त्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर केली. बँकेनेही काहीही न पहाता किंवा काम सुरू झाले, पुर्ण झाले की नाही याची खातरजमा न करता 2014 पासून शेतक:यांना कर्ज मंजुर केले.
कर्जाची रक्कम परस्पर तिरुपती इरिगेशन संस्थेलाही अदा केली गेली. परंतु संस्थेने पॉली हाऊसचे बांधकाम केवळ सुरू करण्याचा बहाणा केला. त्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. पैसे घेवून संस्था इकडे फिरकली नाही. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर पुष्पा गिरीश गावीत यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला.
गावीत यांच्या फिर्यादीवरून नंदराज देवरे, बँकेचे तत्कालीन व विद्यमान व्यवस्थापक, रोखपाल आणि सहायक शाखा व्यवस्थापक यांनी काम वेळेत पुर्ण करून न देता फसवणूक केली. बँक अधिका:यांनी कामाची खात्री करून टप्प्याने कर्ज रक्कमेचे वितरण करणे आवश्यक असतांना संस्थेस फायदा व्हावा या उद्देशाने पुर्ण कर्ज रक्कम वितरीत करून संस्थेचा आर्थिक फायदा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून या सर्वाविरुद्ध फसवणूक, संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक डी.एस.शिंपी करीत आहे.