अवकाळीने बिघडवले शेतक:यांचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:52 IST2019-11-06T12:52:07+5:302019-11-06T12:52:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल 129 टक्के कोसळलेल्या पावसामुळे हुरुप आलेल्या शेतक:यांना अवकाळी पावसाने फटका दिल्याने संपूर्ण ...

अवकाळीने बिघडवले शेतक:यांचे गणित
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल 129 टक्के कोसळलेल्या पावसामुळे हुरुप आलेल्या शेतक:यांना अवकाळी पावसाने फटका दिल्याने संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आह़े उत्पादनासह चाराही हाती येणे मुश्किल झाल्याने येत्या काळात शेतक:यांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागणार आह़े
नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापुर आणि धडगाव तालुक्यात अवकाळी पावसाने वेळोवेळी दिलेल्या हजेरीमुळे शेतात उगवलेली पिके आणि कापणी करुन घराच्या आवारात किंवा खळवाडीत ठेवलेले उत्पादन पूर्णपणे खराब झाल्याची स्थिती आह़े यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु करण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती देण्यात आली होती़ परंतू सोमवारी ब:याच ठिकाणी पंचनामे करण्यासाठी पथक पोहोचले नसल्याच्या तक्रारी शेतक:यांनी केल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी शहादा व तळोदा तालुक्यात भेटी देत पाहणी केली होती़ अधिका:यांच्या या भेटीनंतरही अनेक ठिकाणी पंचनाम्यांची कारवाई सुरु झालेली नसल्याचे सांगण्यात आले आह़े
नंदुरबार
तालुक्यातील उमर्दे खुर्द, भालेर, शिंदगव्हाण, काकर्दे यासह तापी काठावरच्या गावांमध्ये मका, ज्वारी, भूईमूग या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े अनेक ठिकाणी कापसात पाणी गेल्या पिकाच्या वाढीवर परिणाम झाला होता़ तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे सोमवारी पंचनामे करणा:या पथकाची प्रतिक्षा करत शेतकरी थांबून होत़े परंतू पथकाने हजेरी दिलेली नसल्याचे सांगण्यात आल़े या पावसामुळे पेरणी करण्यात आलेल्या उन्हाळी भूईमूगाची नासाडी झाली़ तालुक्यातील न्याहली, भादवड, बलदाणे, वैंदाणे या परिसरात जोरदार अवकाळी पाऊस बरसला होता़ यात शेतक:यांनी कापणी करुन घराबाहेर किंवा खळवाडीत ठेवलेल्या ज्वारीचे नुकसान झाल़े या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने मदत द्यावी अशी मागणी
शेतात उगवले कमरेएवढे गवत, पावसामुळे वाया गेले खत
अवर्षणग्रस्त असलेल्या नंदुरबार तालुक्यात यंदा समाधानकारक असा पाऊस पडल्याने शेतक:यांनी कापूस, मका, ज्वारी, मूग, उडीदसह विविध पिकांची लागवड करुन दुष्काळात झालेल्या नुकसानीची वसुली करण्याचा प्रयत्न केला होता़ यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोसळलेल्या पावसामुळे ब:याच जणांचे हे यश पिकांच्या दमदार वाढीने समोर आले होत़े परंतू सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे हे यश धुतले गेले होत़े यातून सावरत काहींनी नव्याने पिकांची पेरणी करुन शेतीला चालनाही दिली़ याला यश येणारच, तेवढय़ात पुन्हा अवकाळीने पुन्हा शेतक:यांच्या हातचे हिरावून घेतले होत़े तालुक्यातील उमर्दे खुर्द शिवारात अनेक शेतक:यांनी पाण्याच्या उपलब्धतेवर मे महिन्यापासून कापूस लागवड करुन अतीवृष्टीतही कापसाचे संगोपन केले होत़े परंतू झाडावर आलेले बोंड फुटण्याच्या काळातच अवकाळीने हजेरी लावत जमिन ओली केली़ यातून जमिन ओली होऊन मशागतीसाठी जाणेही शेतक:याना मुश्किल झाले परिणामी आधीपासून वाढलेल्या गवतात वाढ होऊन ते कापूस झाडांच्या बरोबरीने पोहोचल्याने कापसाची बोंड फुटण्याची प्रक्रिया थांबून बोंडात अळ्या निर्माण व्हायला सुरुवात झाली़ या भागातील 70 एकरापेक्षा अधिक भागात शेतात ओलावा असल्याने तण काढणेच शक्य नसल्याने शेतकरी हतबलपणे हिरव्या गार कापसाच्या झाडांना पाहत आहेत़ अनेकांनी गवत कापण्यासाठी मजूरांना पाचारण केलेही परंतू ओलाव्यात गवत कापणीसाठी किमान 20 हजार रुपये लागतील अशी मागणी केली गेल्याने शेतक:यांनी अर्धे आता अर्धे नंतर असे सांगून कामाला सुरुवात केली होती़ परंतू पावसाने हजेरी लावल्यानंतर मजूरांचाही नाईलाज झाला आह़े हीच गत भालेर, खोंडामळी आणि कोपर्ली भागातील असंख्य शेतक:यांची आह़े दिवाळीत वातावरणात बदल झाल्याने शेतक:यांनी महागडी खत औषधांची फवारणी करुन कापूस तरतरीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू पावसामुळे दिलेले खत आणि रासायनिक औषधांची फवारणी दोन्ही धुतल्या गेल्याने पाने खाणा:या अळ्या आणि बोंडातील अळ्या जोमाने वाढू लागल्या आहेत़ यावर शासनाने पंचनाम्यांची घोषणा केली असली तरी पंचनामे मात्र झालेले नाहीत़
अवकाळीच्या पंचनाम्यातून बागायतदारांना वगळल्याने शहादा तालुक्यातून नाराजी
बामखेडा: अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे करणा:या महसूल प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आले आहेत़ परंतू पपईसह इतर बागायती पिकांच्या नुकसानीकडे पथकांनी दुर्लक्ष केल्याने शहादा तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आह़े शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरात अवकाळीमुळे फळपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ या भागात आधीच अतीवृष्टीचा फटका बसल्याने शेतक:यांचा खरीप हंगाम वाया गेला आह़े ऑगस्ट महिन्यात जास्त झालेल्या अतीवृष्टीमुळे पिके वाहून गेले होत़े त्याचे पंचनामे झाले परंतू अद्याप त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही़ सलग पाच महीने झालेल्या पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कापूस आणि पपईचे नुकसान झाले होत़े परंतू यात पपईचे पंचनामेच झालेले नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े आताही अवकाळीमुळे पपईचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे न झाल्याने नाराजी व्यक्त होत आह़े जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देऊन केळी, पपई, ऊससह विविध बागायती पिकांचा आढावा घेण्याची मागणी आह़े