शेतक:यांनी पाडला लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:30 IST2019-11-08T12:30:12+5:302019-11-08T12:30:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे बाजार ...

शेतक:यांनी पाडला लिलाव बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुरुवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला धान्यमाल उघडय़ावरच पडला. यामुळे बाजार समितीकडून शेडची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले. व्यापा:यांच्या धान्यमाल शेडमध्ये तर शेतक:यांच्या माल उघड्यावर असल्याच्या आरोप यावेळी शेतक:यांनी केला. वादाची स्थिती पाहून लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. दुपारी लिलाव सुरू करण्यात आले.
दिवाळीच्या सुट्टयानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक:यांनी विक्रीसाठी धान्य आणायला सुरुवात केली आहे. मका, सोयाबीन व बाजरीची आवक ब:यापैकी झाली. आधीच अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत शेतात उभ्या राहिलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजेला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे धान्य मालाची लिलाव प्रक्रिया सुरू होती. शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अचानक आलेल्या पावसात सापडल्याने नुकसान झाले. तेव्हा अनेक शेतकरी संतप्त झाले. शेडची व्यवस्था करण्याची मागणी शेतक:यांकडून करण्यात आली. व्यापा:यांच्या भुसार माल शेडमध्ये ठेवण्यात येतो तर शेतक:यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात येत असल्याचा आरोप काही शेतक:यांनी करताच त्या ठिकाणी वाद उद्भवला त्यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर बाजार समितीच्या शेडमध्ये आल्यानंतर संतप्त झालेल्या मागणी लावून धरली. बाजार समिती प्रशासनाकडून शेतक:यांची समजूत काढण्याचे प्रय} करण्यात येत होते.
बाजार समितीच्या आवारातील नवीन बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यापा:यांनी माल ठेवलेला असून, ती जागा शेतक:यांसाठी उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून धान्याचे नुकसान होणार नाही अशी मागणी संतप्त झालेल्या शेतक:यांनी सभापती किशोर पाटील यांच्याकडे लावून धरली. यावेळी अर्धा ते पाऊण तास गोंधळाचे वातावरण होते. सचिव योगेश अमृतकर यांनी ही शेतक:यांची समजूत काढण्याचा प्रय} केला परंतु, शेतकरी मागणीसाठी ठाम होते. उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले शेतकरी शांत झाल्यानंतर तणाव निवळला. दुपारी 2 वाजता धान्य मालाचा लिलाव करण्यात आला.
अवकाळी पावसाची शक्यता गृहीत धरून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शुक्रवारपासून तीन दिवस धान्य मालाचे लिलाव प्रक्रिया बंद असल्याचे जाहीर केले आहे. शेतक:यांनी धान्य बाजार समितीत आणू नये असे आवाहन सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.