आष्टे येथे कृषिदूत भामरे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:20+5:302021-08-23T04:32:20+5:30
दरम्यान, जनावरांना व कोंबड्यांना रोग प्रतिबंधक लसीकरण, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व पाहणी, गोठा निर्जंतुकीकरण करणे, शेतकऱ्यांना दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनविणे; ...

आष्टे येथे कृषिदूत भामरे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दरम्यान, जनावरांना व कोंबड्यांना रोग प्रतिबंधक लसीकरण, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व पाहणी, गोठा निर्जंतुकीकरण करणे, शेतकऱ्यांना दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनविणे; त्यामध्ये खवा, तूप, दही, लोणी व अन्य पदार्थ घरच्या घरी तयार करणे, आदींबाबत माहिती दिली. या मार्गदर्शनात पहिल्या टप्प्यात आष्ट्याचे प्रगतिशील शेतकरी अधिकार पाटील यांच्या शेतातील माती परीक्षण कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. त्यांना मातीत असणारे घटक, जमिनीतील सामू, मातीचा प्रकार यांची माहिती देऊन पिके लागवडीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषिमित्र यश भामरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. या विद्यार्थ्यास नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रमाधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सुकलाल पाटील, अधिकार पाटील, भूषण पाटील, विजय कापसे, प्रकाश शेवाळे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. गोरख अहिरे, आदी उपस्थित होते.