जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना महसूल विभागातर्फे निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:17+5:302021-07-24T04:19:17+5:30

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ.भारुड यांच्या पत्नी अश्विनी ठाकूर, उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक युवराज राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल ...

Farewell to Collector Dr. Rajendra Bharud on behalf of Revenue Department | जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना महसूल विभागातर्फे निरोप

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना महसूल विभागातर्फे निरोप

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ.भारुड यांच्या पत्नी अश्विनी ठाकूर, उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक युवराज राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डाॅ. भारुड यांनी, कोरोना काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगली टीम मिळाल्यामुळे परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळता आली. यंत्रणेवर विश्वास ठेवल्याने चांगले काम करता आले. प्रत्येक विभागाने आपले काम चोखपणे बजावले. नंदुरबारमधून नवी ऊर्जा घेऊन नव्या पदावरदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल. नंदुरबारकरांचे प्रेम आणि सहकार्य कायम लक्षात राहील असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेसाठी रुग्णवाहिका, वर्गखोल्या व अंगणवाडी बांधकामासाठी डॉ.भारुड यांचे चांगले मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. लसीकरणाला गती देण्यासाठी त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले की, पोलीसांना वाहने व इतर आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी डॉ.भारुड यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यांनी कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी केली. सर्व विभागाच्या समन्वयाने काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने पोलीस विभागालाही चांगले सहकार्य मिळाले.

निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ, मंदार कुलकर्णी, उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, राजेंद्र शिंदे, ओम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Farewell to Collector Dr. Rajendra Bharud on behalf of Revenue Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.