मडकानी येथे बनावट मद्याचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:05 IST2019-11-01T21:05:38+5:302019-11-01T21:05:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मडकाणी ता़ शहादा येथे बनावट देशी मद्य तयार करणा:या कारखान्यावर छापा टाकून उध्वस्त करण्याची ...

Fake liquor factory collapses at Madakani | मडकानी येथे बनावट मद्याचा कारखाना उध्वस्त

मडकानी येथे बनावट मद्याचा कारखाना उध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मडकाणी ता़ शहादा येथे बनावट देशी मद्य तयार करणा:या कारखान्यावर छापा टाकून उध्वस्त करण्याची कारवाई एलसीबीच्या पथकाने केली़ बुधवारी सायंकाळी सात वाजता पथकाने हा छापा टाकला होता़ 
मडकाणी गावाच्या बाहेर एका झोपडीत बनावट देशी दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी बुधवारी मडकाणी परिसरात जाऊन माहिती काढली होती़ यादरम्यान गावाबाहेरील झोपडीत बनावट देशी दारु बाटल्यांमध्ये भरण्यात येत असल्याचे त्यांना दिसून आल़े पोलीसांनी छापा टाकल्यानंतर अंधाराचा फायदा घेत दोघांनी पळ काढला़ पथकातील कर्मचा:यांनी जंगलात पाठलाग करुनही दोघे पळून जाण्यात यशस्वी झाल़े पोलीसांनी झोपडीतून 49 हजार 920 रुपये किमतीच्या देशी मद्याच्या बाटल्या, 22 हजार 500 रुपयांचे बनावट दारु तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट, 5 हजार रुपये किमतीचे दारु सीलबंद करण्यात येणारे मशिन, अल्कोहोल मोजणीचे साधन, काचेच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण 79 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ याप्रकरणी जीवन होमसिंग चौधरी रा़ मडकाणी आणि त्याच्या साथीदार अशा दोघांविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ ढवळे, रविंद्र पाडवी, गोपाल चौधरी, संदीप लांडगे, महेंद्र सोनवणे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली़ पोलीस अधिक्षक पंडीत यांनी पथकाचे कौतूक केल़े 
 

Web Title: Fake liquor factory collapses at Madakani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.