शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघ्या दहा हजार रुपये तोळे अर्थात एक हजार रुपये ग्रॅम प्रमाणे सोने मिळत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या दहा हजार रुपये तोळे अर्थात एक हजार रुपये ग्रॅम प्रमाणे सोने मिळत असल्याचे अमिष दोघांना चांगलेच महागात पडले. परंतु पोलिसांनी वेळीच सापळा रचून तिघांना अटक करीत नकली सोने विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याने अनेकजण यापुढील फसवणुकीपासून वाचले आहेत. दरम्यान, सोन्याचा हंडा, नकली बिस्कीट, नोटांचा पाऊस अशा अनेक घटना उघडकीस येत असतांनाही अमिषाला बळी पडणाऱ्यांचे डोळे उघडत नाही हे स्पष्टच आहे.गजनान उर्फ कल्पेश उर्फ जानी संतोष भोसले (२३), प्रभू सवसारी चव्हाण (१९) व लुकेश मुकेश पवार (२०) सर्व रा.जामदे, ता.साक्री यांना अटक करण्यात आली आहे.या घटनेची हकीकत अशी, राहुल रोहिदास राठोड, रा.बैलखेडा, ता.सोयगाव यांचे मेव्हुणे जगदीश भिमसिंग पवार, रा.खडकातांडा, ता.एरंडोल यांना त्यांचा गुड्डू नामक मित्राने नंंदुरबारात कमी किंमतीत सोने उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्याचे सॅम्पल आपण आणले असल्याचे सांगितले. खात्री करण्यासाठी जळगाव येथे गुड्डूची भेट घेवून सॅम्पल पाहिले असता ते खोरे सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाले. गुड्डू याने नंदुरबार येथील संबधितांशी संपर्क करून देत नंदुरबार येथे सोने घेण्यासाठी बोलविले. २७ जानेवारी रोजी राहुल राठोड, किशोर असे दोघे नंदुरबार येथे आले. त्यांनी संबधितांना फोन केला असता एस.टी.बसने छडवेल येथे येण्यास सांगितले. त्यांतर गजानन नावाच्या व्यक्तीच्या पटेलवाडी येथील घरून सोन्याचे सॅम्पल दिले. सोने असली असल्याचे खात्री झाल्यानंतर हजार रुपये ग्रॅम प्रमाणे चार लाख ९० हजार रुपयांचे सोन्याच्या बांगड्या देण्याचे मान्य झाले. ७ फेब्रुवारी रोजी राहुल राठोड, त्यांचे वडिल रोहिदास राठोड व जळगाव येथील सराफा अनिल सोनार हे खाजगी वाहनाने नंदुरबारातील पटेलवाडी येथे आले. तेंव्हा देखील संशयीतांनी त्यांना सॅम्पल दिले. सोनाराने ते पारखून असली असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे चार लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या असलेली पिशवी राठोड यांच्या स्वाधिन करण्यात आली. जळगाव येथे पिशवीतील सोने तपासले असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाल्याने राठोड परिवाराने आपण फसविले गेल्याचे ओळखले. त्यांनी जळगाव येथे पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी नंदुरबार पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितल्यावर राहुल राठोड यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून माहिती दिली.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना तक्रारीचे गांभिर्य पाहून लागलीच तपासण करण्याचे निर्देश दिले. गजानन नामक व्यक्तीशी झालेल्या संभाषणातील मोबाईल नंबर पोलिसांनी घेत त्याला ट्रेस केले. हा नंबर नंदुरबारातच कार्यरत असल्याचे लक्षात आल्यावर पाळत ठेवण्यात आली. १३ रोजी जिजामाता महाविद्यालयाजवळील बजाज आॅटो नजीक नंबर कार्यरत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली. बाजुच्या रस्त्यावर दुचाकीजवळ तीनजण उभे असल्याचे लक्षात आले.तक्रारदार यांनी त्यांना ओळखताच एलसीबीच्या पथकाने झडप घालुन तिघांना ताब्यात घेतले.सुरुवातीला तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीशी हिसका दाखवताच त्यांनी घटनेची कबुली दिली. तिन्ही बेरोजगार असून दिवसभर कुठल्याही नंबरवर डायल करून अनोळखी व्यक्तींशी संपर्क करून त्यांना जाळ्यात ओढण्याचा त्यांचा उद्योग आहे.गुन्हा धुळे जिल्हा हद्दीत घडलेला असतांना हद्दीचा विचार न करता तक्रारदाराला प्रथम न्याय देण्याचा उद्देशाने नंदुरबार एलसीबीने तात्काळ गुन्हेगारांना अटक केली. आरोपी, मुद्देमाल निजामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार सजन वाघ, बापू बागुल, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.जामदे भागात यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. मांडूळ, नकली सोने, पैशांचा पाऊस पाडणे याचे अमिष दाखवून अनेकांना लुबाडण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आवाहन करून सोन्याचा हंडा, नागमनी, जादूचा ग्लास, नोटांचा पाऊस, नोटा दुप्पट करून देणे आदींबाबत अमिष दाखविण्याचा कुणी प्रयत्न केल्यास थेट स्थानिक पोलीस किंवा एलसीबीच्या पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पंडित यांनी केले आहे.