जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी १५ केंद्रांवर सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:46+5:302021-06-23T04:20:46+5:30

शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून १५ लसीकरण केंद्रांची सोय ...

Facilities at 15 centers for vaccination of citizens above 18 years of age in the district | जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी १५ केंद्रांवर सोय

जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी १५ केंद्रांवर सोय

शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून १५ लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली आहे. केंद्रांना दररोजचा ठरावीक लसीकरण कोटा देण्यात आला असून, त्यात काही लसी या ऑनलाईन नोंदणी, तर काही लसी या ऑनस्पॉट तत्त्वानुसार देण्यात येणार आहेत. त्यात अक्कलुवा ग्रामीण रुग्णालयात दररोज १५० जणांचे लसीकरण होणार आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालय १६०, झापी प्राथमिक आरोग्य केंद्रात १५०, चुलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात २००, तळोदा ग्रामीण रुग्णालयात २००, नवापूर ग्रामीण रुग्णालय २००, चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २००, शहादा नागरी आरोग्य केंद्रात २००, प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात २००, कुसुमवाडा आरोग्य केंद्रात १५०, वाघर्डे आरोग्य केंद्रात २००, जिल्हा शासकीय रुग्णालयात २००, जयप्रकाश नारायण नागरी आरोग्य केंद्रात २००, माळीवाडा नागरी आरोग्य केंद्रात २०० आणि तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे दररोज १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

पूर्वीप्रमाणेच ३० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियोजित केंद्रावर सुरू राहणार आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लसीचा पुरेशा प्रमाणात साठा आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

Web Title: Facilities at 15 centers for vaccination of citizens above 18 years of age in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.