लोकसहभागातून खर्डी नदीचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:01 IST2019-06-13T12:00:18+5:302019-06-13T12:01:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांना प्रचंड वेग आला असून, पाच ते सहा दिवसातच ...

लोकसहभागातून खर्डी नदीचे खोलीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांना प्रचंड वेग आला असून, पाच ते सहा दिवसातच खर्डी नदीतील जलपात्राचे दोन किलोमीटर र्पयत खोलीकरण व रूंदीकरण करून ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे करण्यात आले आहे. दरम्यान कार्यकत्र्याचा उत्साह पाहून शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिकही कामांच्या ठिकाणी भेट देवून सढळ हाताने लोकवर्गणी देत आहेत.
तळोदा शहरासह संपूर्ण तालुक्यात कधी नव्हे एवढी यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साहजिकच या दुष्काळाची झळ सामान्यांपासून तर सर्वानाच बसत आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे केल्याशिवाय पर्याय नाही, अशी जाणीव शहरवासीयांना झाली. त्यातच माळी समाजातील काही तरूणांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी नांगरटी व खोलीकरण करण्यासाठी तालुका आणि प्रशासनाची परवानगी घेतली. प्रत्यक्षात शुक्रवारपासून शहरानजीकच्या खर्डी नदीच्या पात्रातील खोलीकरणाचा शुभारंभ जेसीबी यंत्राने करण्यात आला.
लोकसहभाग व लोकवर्गणीतून हाती घेण्यात आलेल्या या कामाने प्रचंड वेग घेतला असून, पाच ते सहा दिवसातच खर्डी नदीपासून तर दलेलपूर र्पयतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या पात्राचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर ठिकठिकाणी 10 बाय पाचचे मोठ-मोठे खड्डेदेखील करण्यात आले आहे. साहजिकच या कामांमुळे प्रचंड जलसाठा निर्माण होणार आहे. तसेच बहुतेक ठिकाणी नदीचे पात्र अतिशय रूंद झाले होते. शिवाय प्रवाहही बंद झाला होता.
विशेषत: तरूणांनी या उपक्रमात मोठय़ा प्रमाणात प्रत्यक्षात सहभाग घेतलाअसून, तेच अधिक परिश्रम घेत आहेत. त्यांचा हा उत्साह पाहून शहरातील प्रतिष्ठित नागरिकही कामांच्या ठिकाणी भेट देवून सढळ हाताने आर्थिक मदत करीत आहे. सद्या पोकलॅण्ड यंत्राच्या सहाय्याने खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. नदीतील गाळ उपसण्यासाठी काही ट्रॅक्टर मालकांनी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे खर्डी नदीच्या पात्रात वाहतुकीची अक्षरश: वर्दळ सुरू आहे.