नंदुरबारात घरकुलाच्या सव्रेक्षणासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:32 IST2018-10-09T12:32:07+5:302018-10-09T12:32:16+5:30
आवास योजना : ग्रामसभांमधून ड यादीसाठी 2 लाख ग्रामस्थांचे अर्ज दाखल

नंदुरबारात घरकुलाच्या सव्रेक्षणासाठी मुदतवाढ
नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेत नवीन लाभार्थी समाविष्ट करून घेण्यासाठी सुरु झालेल्या प्राथमिक सव्रेक्षणाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आह़े जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेद्वारे संकलित केलेल्या 2 लाख 20 हजार अजर्दारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी घरकुल मिळण्यास बराच कालावधी लागणार आह़े
जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज ‘आवास प्लस’ नावाच्या अॅपमधून भरून घेण्याची सूचना असताना ग्रामसेवकांकडून छापील अर्ज वाटप करत लाभार्थीची माहिती भरण्यात येऊन पैसे उकळल्याचा आरोप झाला होता़ या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ या प्रकारानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी चौकशी करत ग्रामीण विकास यंत्रणेला सव्रेक्षण गांभिर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ महिनाभरापासून ग्रामपंचायतींना प्राप्त झालेले अर्ज ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल करण्यात येत होत़े अर्ज प्राप्तीनंतर कामकाजाला गती आली असून ‘ड’ यादीसाठी मागवल्या गेलेल्या अर्जाचे सव्रेक्षण सुरु करण्यात आले आह़े या सव्रेक्षणात 15 दिवसांचा व्यत्यय आल्याने कामकाज रखडले होत़े यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने सव्रेक्षणाचा कालावधी वाढवून दिला आह़े यामुळे ड यादी नाव समाविष्ट होण्याच्या घरकुल अजर्दारांच्या अडचणी दूर झाल्या आहेत़ जिल्ह्यातील 595 ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ग्रामसभांमध्ये 2 लाख 18 हजार 135 अर्ज दाखल करण्यात आले होत़े सध्या सुरु असलेल्या घरकुल लाभार्थीच्या ब यादीत नावे नसलेल्या अजर्दारांनी हे अर्ज केले आहेत़ यातील 18 हजार 26 लाभार्थीचे सव्रेक्षण ग्रामीण विकास यंत्रणेने नियुक्त केलेल्या 595 ऑपरेटर्सकडून नुकतेच पूर्ण करून घेतले आह़े अद्यापही जिल्ह्यात दोन लाख लाभार्थीचे सव्रेक्षण शिल्लक आह़े केंद्र शासनाच्या आवास प्लस या अॅपद्वारे सव्रेक्षण सुरु असताना 15 दिवस तांत्रिक अडचणींमुळे सव्रेक्षण बंद झाले होत़े परंतू गेल्या आठवडय़ापासून हे अॅप पुन्हा कार्यान्वित होऊन सव्रेक्षणासाठी 30 नोव्हेंबर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े
अजर्दारांच्या सव्रेक्षणानंतर केंद्र शासनाकडून सुधारणा करून डीआरडीएला परत पाठवण्यात येणार आह़े तद्नंतर पुढील काळात यादीत समाविष्ट लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजनेत स्थान मिळून 1 लाख 20 हजार रूपयांर्पयतचा लाभ मिळू शकणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सुरु असलेल्या सव्रेक्षणाला लाभार्थी गांर्भियाने घेत प्रतिसाद देत असल्याची माहिती आह़े