नवापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा व भौतिक सुविधा मिळाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:10+5:302021-09-05T04:34:10+5:30
या वेळी समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र डके, छोटू पाटील, कैलाश वर्मा, हरीश राजगोर, विभा अवस्थी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतील ...

नवापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा व भौतिक सुविधा मिळाव्यात
या वेळी समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र डके, छोटू पाटील, कैलाश वर्मा, हरीश राजगोर, विभा अवस्थी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतील सदस्यांनी रेल्वे स्टेशन येथे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या. त्यानंतर विविध संघटना, नगरपालिका, विविध पक्ष, व्यापारी संघटना आदींनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
नवापूर मर्चंट सेवा असोसिएशन यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, नवापूर रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेला दूरध्वनी क्रमांक २५०२२२ अनेक वर्षांपासून बंद आहे. तो पुन्हा सुरू करा किंवा दुसरा सार्वजनिक संपर्क क्रमांक जारी करा. नवापूर रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे २९ रेल्वे गाड्या जातात, त्यापैकी फक्त पाच फास्ट पॅसेंजर आणि दोन मेमो ट्रेन थांबतात. ज्या नवापूर व नवापूरच्या प्रवाशांसाठी पुरेसे नाही. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील औद्योगिक केंद्र, तहसील उद्योगात झपाट्याने वाढत आहे. देशातील विविध राज्यांत जाणारे प्रवासी नवापूर येथून तिकीट घेऊ शकतात. ऑनलाइन तिकीट खरेदी करून सुरत (११० किमी) किंवा नंदुरबार (६५ किमी) वरून बोर्डिंग घ्यावे लागेल. गोरखपूर-मुंबई, द्वारका एक्स्प्रेस, पुरी-अहमदाबाद, नवजीवन एक्स्प्रेस, चेन्नई-जोधपूर या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना नवापूर रेल्वेस्थानकावर थांबा मिळाल्याने नंदुरबार, धुळे, तापी व डांग जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होईल.
समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी नवापूरकरांच्या रेल्वेकडून असलेल्या मागण्यांची दखल घेऊन सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबत या वेळी माहिती देण्यात आली. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी खाकरफळी भागातील रेल्वे पुलाजवळ पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत पत्र दिले. या वेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समितीने स्वीकारलेल्या निवेदनावर कितपत कार्यवाही होऊन उपाययोजना केल्या जातात याकडे लक्ष लागून आहे.