रायखेड येथील केळीची अरब राष्ट्रात निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:08+5:302021-03-23T04:32:08+5:30
शहादा : तालुक्यातील रायखेड येथील शेतकरी डॉ. आनंद पाटील यांनी उत्पादित केलेल्या केळीने सातासमुद्रापार उड्डाण केले असून, अरब राष्ट्रातील ...

रायखेड येथील केळीची अरब राष्ट्रात निर्यात
शहादा : तालुक्यातील रायखेड येथील शेतकरी डॉ. आनंद पाटील यांनी उत्पादित केलेल्या केळीने सातासमुद्रापार उड्डाण केले असून, अरब राष्ट्रातील ईराण व ओमान येथे या केळ्यांची विक्री होत आहे.
डॉ. आनंद पाटील यांनी कृषी ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा सातत्याने प्रयोग करून गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात साडेचार हजार केळीची रोपे लावली होती. त्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत नंदकिशोर पाटील व नंदलाल वसईकर यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. पाटील यांच्या परिश्रमाचे फळ म्हणून त्यांचा केळीचा प्लॉट चांगल्या पद्धतीने बहरला असून, गुणवत्ता व उच्चप्रतीच्या केळीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. यावर्षी त्यांनी उत्पादीत केलेल्या केळ्यांना ईराण व ओमान येथून मागणी असून, गेल्या आठवड्यात हे केळ्याचे कंटेनर रवाना झाले आहेत. डाॅ. पाटील यांची केळीची बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या शेताला भेट देत आहेत.