रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघातात स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:12 IST2019-02-24T18:12:34+5:302019-02-24T18:12:45+5:30
नवापूर : शहरालगतच्या उच्छल तालुक्यात उच्छल-निझर रस्त्यावर पेट्रोल भरुन जाणारा टँकर ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात होऊन एक जण गंभीर ...

रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघातात स्फोट
नवापूर : शहरालगतच्या उच्छल तालुक्यात उच्छल-निझर रस्त्यावर पेट्रोल भरुन जाणारा टँकर ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात होऊन एक जण गंभीर भाजल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
उच्छल-निझर रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. वडपाडा शिवारात एका ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. तेथे वळण रस्त्याचे फलक दिसून न आल्याने कामावर असलेल्या उभ्या ट्रॅक्टरवर पेट्रोल वाहून नेणारा टँकर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदळला. त्यापाठोपाठ एक दुचाकीस्वार मागून ठोकला गेला. अपघातात टँकर व ट्रॅक्टर जवळच्या नाल्यात घसरत जाऊन मोठा स्फोट होऊन मोटारसायकलस्वार गंभीर भाजला गेला. त्याला व्यारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी नवापूर व सोनगढ येथील अग्निशामक दलास चार तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. उच्छलचे पोलीस निरीक्षक दवे व सहकारी घटनास्थळी धावून गेले. अपघातात पाच लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम करणाºया ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, भाजलेल्या दुचाकीस्वाराची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.