विज्ञानासोबत विद्याथ्र्याची घट्ट मैत्री करुन देणारे प्रयोगशील ‘शिक्षक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:53 IST2019-09-05T14:53:30+5:302019-09-05T14:53:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याची विज्ञानाप्रती जिज्ञासा वाढून त्यातून नवनवीन प्रयोग व्हावेत म्हणून सातत्याने परीश्रम घेणारे शिक्षक म्हणून ...

Experimental 'teacher' who forges a close friendship with science | विज्ञानासोबत विद्याथ्र्याची घट्ट मैत्री करुन देणारे प्रयोगशील ‘शिक्षक’

विज्ञानासोबत विद्याथ्र्याची घट्ट मैत्री करुन देणारे प्रयोगशील ‘शिक्षक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्याथ्र्याची विज्ञानाप्रती जिज्ञासा वाढून त्यातून नवनवीन प्रयोग व्हावेत म्हणून सातत्याने परीश्रम घेणारे शिक्षक म्हणून दिनेश वाडेकर यांची ओळख आह़े शहरातील डी़आऱ हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून काम करणारे दिनेश वाडेकर यांना माध्यमिक विभागातून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आह़े 
2002 पासून डी़आऱ हायस्कूलमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या दिनेश वाडेकर हे विद्याथ्र्याच्या सर्वागीण विकासासाठी तळमळीने कार्य करत आहेत़ अत्यंत हालाखीच्या स्थितीत स्वत:च्या पायावर शिक्षण घेत त्यांनी शिक्षकीेपेशा स्विकारला़ समाजसेवा, विज्ञानछंद मंडळ, महाराष्ट्र गणित व विज्ञान अध्यापक महामंडळ, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, विज्ञान प्रदर्शन, एड्स जनजागृती, नेत्रतपासणी, सर्वशिक्षा अभियानांतर्गत तज्ञ मार्गदर्शक आणि हरीतसेना यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला होता़ यादरम्यान विद्याथ्र्यामध्ये ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा म्हणून विविध स्थळांना भेटी आयोजित केल्या होत्या़ अत्यंत कमी काळ रजा घेणा:यांपैकी एक असलेले वाडेकर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत़ विज्ञानासोबत निगडीत असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांसोबत कार्य करत असताना विद्याथ्र्यासाठी वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजनही त्यांनी सातत्याने केले आह़े 
शिक्षण विभागाकडून होणा:या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग आठ वेळा सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावर तीन वेळा निवड झाली आह़े राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान त्यांना मिळाला आह़े 

विद्याथ्र्याना विज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ते विज्ञानसोबत निगडीत असलेल्या शोधनिबंधांचे वाचन वर्गामध्ये घडवून आणतात़ नवनवीन गॅङोटस आणि वैज्ञानिक प्रयोग यावर विद्याथ्र्याचा खुला संवाद घेत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करतात़ यातून जिज्ञासू विद्यार्थी नियमित त्यांच्या संपर्कात राहून ज्ञानाजर्न करत आहेत़ 
 

Web Title: Experimental 'teacher' who forges a close friendship with science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.