शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा असली तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र हा प्रयोग पुरता फसला आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून अनेक गट आणि गणात याच पक्षांमध्ये प्रमुख लढत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तब्बल डझनभर नेत्यांचे वारसदार या निवडणुकीत भवितव्य अजमावीत असून त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. माघारीनंतर सर्वच गट आणि गणातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या निवडणुकीतही राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू झाली होती. त्या संदर्भात या तिन्ही पक्षातील नेत्यांची मुंबईतही बैठक झाली होती. मात्र स्थानिक राजकारण आणि सर्वच पक्षातील इच्छूक उमेदवारांची मनधरणी करण्यात नेत्यांनाही अवघड झाल्याने महाविकास आघाडी न होता तिन्ही पक्षांतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता या जिल्हा परिषदेत पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्टÑवादी होती. शिवसेना आणि भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने राजकीय समिकरण पुरते बदलले आहे. निवडणुकीत भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही बहुतांश सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. पण शिवसेना आणि राष्टÑवादीला मात्र सर्वच ठिकाणी उमेदवार देणे शक्य झालेले नाही. राष्टÑवादीने एकुण ५६ पैकी १४ गटात तर ११२ गणापैकी ११ गणात अधिकृत उमेदवार दिले आहेत. याशिवाय १४ अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. शिवसेनेला देखील अनेक ठिकाणी उमेदवार देता आलेले नाही. अशा स्थितीत निवडणुकीत कुण्या एका पक्षाची सत्ता येईल अशी स्थिती आजतरी दिसून येत नाही.या निवडणुकीचे वैशिष्टये म्हणजे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणारे भाजपचे भरत गावीत व भाजपतीलच बंडखोर उमेदवार नागेश पाडवी हे दोन्ही भाजपतर्फे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवित आहेत. बहुतांश नेत्यांचे वारसदार देखील आपले भाग्य अजमावीत आहेत. त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत नाईक व दीपक नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी डॉ. कुमुदिनी गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड. राम रघुवंशी, माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना व राजश्री गावीत, माजी आमदार अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या अ‍ॅड.सिमा वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी आदींचा समावेश आहे. नेत्यांच्या वारसदारांचे भवितव्य ठरविणारी असून निवडणुकीनंतर कुणाची पक्षाची युती होईल याची उत्सूकता आहे.सर्वच पक्षातर्फे प्रचाराला जोर आला आहे. भाजपतर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी प्रचारासाठी येत असून त्यांच्या धडगाव आणि बोरद येथे प्रचार सभा आहेत. तर काँग्रेसतर्फे मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची शुक्रवारीच धडगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक आहे. इतरही नेत्यांच्या बैठक होत आहेत.