शहादा येथील श्री गुजराथी वैष्णव समाजाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:30+5:302021-07-31T04:30:30+5:30

श्री गुजराती वैष्णव समाज शहादा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. या समाजाने गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवादरम्यान ...

Executive of Shri Gujarathi Vaishnav Samaj at Shahada announced | शहादा येथील श्री गुजराथी वैष्णव समाजाची कार्यकारिणी जाहीर

शहादा येथील श्री गुजराथी वैष्णव समाजाची कार्यकारिणी जाहीर

श्री गुजराती वैष्णव समाज शहादा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. या समाजाने गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवादरम्यान गरबा उत्सव ही संस्कृती जपून ठेवलेली आहे. दरवर्षी विविध गरबा नृत्य सादर करून शहर नव्हे, तर तालुक्याच्या लोकांची याठिकाणी नवरात्रोत्सवात गर्दी होते. त्याचप्रमाणे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कोजागिरी पौर्णिमा तसेच समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना समाजसेवा पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक, विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, शालेय साहित्य वाटप यासह समाजात पूरग्रस्तांना मदत, दुःखी-पीडितांना सहकार्य आदी सेवाभावी कार्य हा समाज करतो. श्री गुजराती वैष्णव समाजाची बैठक होऊन या बैठकीत समाजाचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष जयेश देसाई, उपाध्यक्ष रिना शाह, खजिनदार पंकज गुजराथी, सचिव राजू शाह, तर सदस्यपदी नरेंद्रकुमार शाह, अशोक गुजराथी, राजेश वाणी, डॉ. अतुल शाह, गोपाल गुजराथी, दत्तू वाणी, आरती वाणी आदींची निवड करण्यात आली.

Web Title: Executive of Shri Gujarathi Vaishnav Samaj at Shahada announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.