शहादा तालुका प्रवासी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:10+5:302021-08-22T04:33:10+5:30
रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून ते विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रवासी महासंघ काम करतो. प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायतीशी ...

शहादा तालुका प्रवासी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून ते विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रवासी महासंघ काम करतो. प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायतीशी निगडीत आहे. शहादा येथे के.डी. गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष उदय निकुंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या शहादा तालुका शाखेची स्थापना होऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी सुनील सोमवंशी, सचिव अजबसिंग गिरासे, संघटक प्रमोद सोनार, सहसंघटक दिलीप खेडकर, उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र कलाल व प्रा.अनिल सोलंकी, सहसचिव श्रीकृष्ण सोनार, कोषाध्यक्ष प्रकाश शेळके, प्रसिद्धी प्रमुख हर्षल साळुंखे, सदस्य अंबालाल पाटील, हर्षल पवार, के.डी .गिरासे, निमंत्रित सदस्य उदय निकुंभ व डॉ.राजेश सावळे, कायदेशीर सल्लागार प्रितेशकुमार जैन यांची निवड करण्यात आली.