मोड परिसरात बिबट्याचे दोन बछडे मिळाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:54+5:302021-02-24T04:32:54+5:30
मोढ गावासह परिसरात ६ ते ७ नर मादी बिबट्या असण्याची शक्यता असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मोढ व ...

मोड परिसरात बिबट्याचे दोन बछडे मिळाल्याने खळबळ
मोढ गावासह परिसरात ६ ते ७ नर मादी बिबट्या असण्याची शक्यता असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मोढ व आजूबाजूच्या परिसरातील गावातील ग्रामस्थांना दर एक दिवसाआड बिबट्या दिसून येत आहे.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घराबाहेर निघताना धोका पत्कारावा लागत असल्याने दैनदिन कामावर परिणाम होत आहे.
शेत पिकांचे नुकसान
शेत शिवारात वारवांर बिबट्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भीती वाटत आहे.पिकांना योेग्यवेळी फवारणी,खते,पाणी द्यावे लागतात, मात्र पिकांची देखभाल ठेवता येत नसल्याने नुकसान होत आहे. शेतकऱ्याकडून बिबट्याना जेरबंद करून अभयअरण्यात सोडण्याची मागणी वारवांर वनविभागाकडे करण्यात येत आहे.
बछडे असलेल्या क्षेत्रातील १५ किलोमीटरच्या आसपास बिबट्या मादी असण्याची शक्यता आहे. आज रात्री पिल्लांना सुखरूप उचलून नेईल,तो पर्यत या ठिकाणी बघ्याची गर्दी करू नये,आणि या भागात ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात जाताना दक्षता घेऊन काम करावे.
-नीलेश रोढे,वनक्षेत्रपाल तळोदा