११ गट व १४ गणातील सदस्यांचे सदस्यत्व रद्दमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:50+5:302021-03-07T04:28:50+5:30
नंदुरबार जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी कॅांग्रेस आणि शिवसेनेची युती झाली. सभापती निवडीच्या वेळी मात्र कॅाग्रेस शिवसेनेसह ...

११ गट व १४ गणातील सदस्यांचे सदस्यत्व रद्दमुळे खळबळ
नंदुरबार जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी कॅांग्रेस आणि शिवसेनेची युती झाली. सभापती निवडीच्या वेळी मात्र कॅाग्रेस शिवसेनेसह भाजपलाही संधी देऊन नवे राजकीय समिकरण पहायला मिळाले. त्यामुळे वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात विरोधी पक्ष अधिकृतपणे राहिलाच नाही. मात्र सत्ताधारींमध्येच खटके आणि वाद पहायला मिळाले. अशा राजकीय परिस्थितीत ११ गटांची निवडणूक नव्याने घेण्याचे संकेत मिळाल्याने राजकारणाचे समिकरण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. जे ११ सदस्य आहेत त्यापैकी उपाध्यक्षांसह दोन सभापती आहेत व इतर सदस्यही प्रतिष्ठीत व राजकीय वलय असलेले असल्याने या निर्णयामुळे राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद एकुण जागा- ५६
सदस्यत्व रद्द झालेले - ११
शिवसेना- दोन, भाजप- सहा, कॅांग्रेस- २
पंचायत समिती
शहादा- ८, नंदुरबार- ५, अक्कलकुवा-१