शहाद्यातून तीन बालिका बेपत्ता झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:31 IST2019-06-18T21:31:16+5:302019-06-18T21:31:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मलोणी परिसरात राहणा:या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आह़े तिघींचे पालक ...

शहाद्यातून तीन बालिका बेपत्ता झाल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील मलोणी परिसरात राहणा:या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आह़े तिघींचे पालक मजूरीसाठी धडगाव तालुक्यातून शहादा येथे आले होत़े यादरम्यान ही घटना घडली़
धडगाव तालुक्यातील त्रिशुल येथून तीन कुटूंब मलोणी परिसरात मजूरीसाठी आले आह़े येथे मजूरी करुन त्यांचा उदरनिर्वाह सुरु असताना 14 जून रोजी जोमा हमा पराडके यांची 10 वर्षीय मुलगी ललिता, संजय बदा पावरा यांची मुलगी गौरी (12) आणि गण्या ठोग्या पावरा यांची मुलगी निशा (15) बेपत्ता झाल्याचे दिसून आल़े तिन्ही कुटूंबांनी धडगाव आणि शहादा परिसरात तिघींचा शोध घेऊनही त्या मिळून आलेल्या नसल्याने त्यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आह़े या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून एकाच वेळी तिघी बालिका बेपत्ता झाल्याने भिती व्यक्त होत आह़े याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी तिन्ही कुटूंबांची भेट घेत विचारपूस केली़ बालिकांचा शोध सुरु आह़े