उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसेवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:30 IST2018-10-09T12:27:59+5:302018-10-09T12:30:26+5:30
जिल्हा परिषद : 2012 पासून होते पुरस्कार प्रलंबीत, 15 जणांचा समावेश

उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसेवकांचा गौरव
नंदुरबार : ग्राम विकासाचा पाया भक्कम करण्यात ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची ठरते. त्यामुळे ग्रामसेवकांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी केले. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसेवकांचा पुरस्कार देवून सोमवारी गौरव करण्यात आला. दरम्यान, 2012-13 पासूनचे हे पुरस्कार आहेत.
जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, लताबाई पाडवी, जालींदर पठारे आदी उपस्थित होते.
2012 पासून जिल्ह्यातील ग्रामससेवक पुरस्कारांचे पुरस्कार रखडले होते. अखेर निवडणुकांच्या आधी त्यांना मुहूर्त सापडला व सोमवारी त्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतांना रजनी नाईक म्हणाल्या, ग्रामविकासाच्या योजना तळागाळार्पयत पोहचवल्या पाहिजेत. गावपातळीवर काम करतांना सरपंचांशी थोडाफार विवाद होत असेल परंतु तो सामोपचाराने मिटवून गाव विकासाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. रिक्त जागांचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
रणधीर सोमवंशी यांनी सांगितले, चांगल्या कामाची पावती मिळतेच. ते या पुरस्कारांनी सिद्ध होते. ग्रामपंचायत स्तरावर 14 व्या वित्त आयोगाचा निधी बरोबरच पेसाचा निधीही मिळत असतो. त्याचा योग्य रितीने चांगला वापर करावा. येणा:या 15 व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतकडून तयार होणा:या विकास आराखडय़ात तो उपजिविका आधारीत असावा अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आता काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी ग्रामपंचायत विभागातर्फे राबविण्यात येणा:या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थ्ीतर्फे ग्रामसेवक र}ाकर शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील ग्रामसेवक संख्येने उपस्थित होते.अरुणसिंग रुपसिंग कुवर, मुंदलवड, ता.धडगाव, अशोक चैत्राम लामगे, पिंप्राणी, ता.शहादा. वामन देवमन महाले, दलेलपूर, ता.तळोदा. निर्मला रुपसिंग पराडके, खुंटामोडी, ता.धडगाव. आनंदी ठोबा पावरा, चिंचकाठी, ता.धडगाव. परमेश्वर विठोबा गंडे, कारेघाट, ता.नवापूर. लिला विरसिंग पाडवी, देवमोगरा, ता.अक्कलकुवा. र}ाकर रतिलाल शेंडे, आमलाड, ता.तळोदा. दिनेश बाबुलाल राठोड, शिरवाडे, ता.नंदुरबार. दिपाली अरविंद उगलमुगले, भागापूर, ता.शहादा. कल्पना तानाजी वसावे, बोकळझर, ता.नवापूर. हिंमत रणछोड वंजारी, म्हसावद, ता.शहादा. मनोज कोमलसिंग वसावे, कडवामहू, ता.अक्कलकुवा, शोभा लोटन पाटील, दहिंदुले, ता.नंदुरबार व अमोल पुंजाजी मेहेत्रे, मोहिदा, ता.तळोदा यांचा समावेश आहे.