कोरोनाशी लढण्यासाठी माजी सैनिक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:16 IST2020-05-03T13:16:25+5:302020-05-03T13:16:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी ...

 Ex-soldiers on the field to fight Corona | कोरोनाशी लढण्यासाठी माजी सैनिक मैदानात

कोरोनाशी लढण्यासाठी माजी सैनिक मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी लढण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवानिवृत्तीनंतरही शहराच्या रक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरले आहे. शहरातील विविध ठिकाणी ते बंदोबस्त करीत आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावातील तरूण सैन्यदलात नोकरीला आहेत. कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या भागातील नागरिक सैन्यदलात नोकरी करून आपल्या गावासह तालुक्याचा नावलौकीक राखून आहे. सेवानिवृत्तीनंतर शांतपणे जीवन जगायचे असा अलिखित नियम असतानाही केवळ आपल्या देशावर नाहीतर आपल्या तालुक्यासह परिसरावर संकट आले म्हणून आपल्या अंगी असलेला सैनिकी बाणा या सैनिकांना स्वस्थ बसू देईना. या संकट समयी प्रशासनाला मदत म्हणून सहकार्य करायला तालुक्यातील माजी सैनिक सरसावले असून, त्यांनी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांची भेट घेऊन या संकट समयी आम्ही आपणास काय मदत करू शकतो असा प्रश्न विचारून शहरात बंदोबस्तासाठी आम्हाला नेमावे अशी या सैनिकांनी मागणी केल्यानंतर त्यांना शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्यानंतर याची लागण शहरात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण शहरात आढळून आले आहे. १८ मार्चपासून शहरातील महसूल, पोलीस व पालिका प्रशासन २४ तास तत्पर असून, या संकट समयी नागरिकांनी घरीच राहावे असे, आवाहन करीत आहे. मात्र दुर्देवाने काही नागरिक प्रशासनाच्या या आव्हानाला न जुमानता विनाकारण शहरात गर्दी करत असल्याने प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलात सेवानिवृत्ती झालेल्या माजी सैनिकांनी शहरात सेवा देण्याचा निर्णय घेतला. यात संतोष युवराज पाटील, भानुदास ताराचंद देवरे, भाऊराव सदाशिव सोनवणे, रवींद्र शिवाजी पवार, सर्व रा.मंदाणे, दीपक नारायण निकम, रा. दामळदा, दिलीपसिंग गिरासे, रा.डोंगरगाव, रामसिंग सुळे, रा.वडगाव, केवलसिंग गिरासे, सिताराम दशरथ भिल, पिंपर्डे, ता.शहादा यांचा समावेश आहे.
माजी सैनिकांच्या या निर्णयाचे स्वागत शहादेकरांनी केले असून, त्यांच्या सन्मानार्थ शहरातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून हे सैनिक शहरातील विविध भागात आपली सेवा देत असून, परिणामी शहरातील गर्दी कमी झाली आहे.

Web Title:  Ex-soldiers on the field to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.