अखेर तो कचरा डेपो नगरपंचायत प्रशासनाने हलवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:18+5:302021-06-25T04:22:18+5:30
धडगाव : तालुक्यातील पालखा ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो नगरपंचायतीने अखेर उचलून दुसरीकडे हलवला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांच्याकडून ...

अखेर तो कचरा डेपो नगरपंचायत प्रशासनाने हलवला
धडगाव : तालुक्यातील पालखा ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो नगरपंचायतीने अखेर उचलून दुसरीकडे हलवला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
धडगाव शहरातील गोळा केलेला कचरा नगरपंचायतीकडून तळोदा ते धडगाव रस्त्यावर पालखा ग्रामपंचायत हद्दीत एका बाजूला टाकण्यात येत होता. हा कचरा डेपो नेमका कधी सुरू झाला याची माहिती नसली तरी तो अनधिकृत असल्याचे पालखा ग्रामपंचायतीचे म्हणणे होते. दिवसेंदिवस कचरा वाढत असल्याने त्यातून दुर्गंधी येण्यासह गुरांचा मृत्यू झाल्याचे प्रकारही समोर आले होते. १३ जून रोजी प्रताप सुन्या पावरा यांचा दुभती म्हैस कचरा खाल्ल्यानंतर मृत्युमुखी पडली होती. याप् रकाराची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ यांनी निवेदने देऊन १० दिवसांच्या आत हा कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली होती. धडगाव नगरपंचायतीने तातडीने या निवदेनांची दखल घेत हा डेपो या ठिकाणाहून दुसरीकडे हलवला आहे. दरम्यान, धडगाव हे सातपुड्याच्या दुर्गम भागातील शहर आहे. भाैगोलिकदृष्ट्या वेगळेपण जपणारे, तसेच जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या शहरातील कचरा डेपो आटोपशीर ठेवत संकलित होणाऱ्या कचऱ्यातून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.