अखेर माळीवाडा परिसर झाला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:40 IST2020-07-09T12:40:29+5:302020-07-09T12:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील मोठा माळीवाडा परिसर कोरोना मुक्त झाल्याने नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा बुधवारी नागरी सन्मान केला. ...

अखेर माळीवाडा परिसर झाला कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील मोठा माळीवाडा परिसर कोरोना मुक्त झाल्याने नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा बुधवारी नागरी सन्मान केला.
तळोदा शहरतील ठाणे कनेक्शन असलेल्या या भागातील वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सपंर्कातील १० जन कोरोना पॉझिटीव्ह आले होते. हे सर्व जनांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आल. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. मोठामाळी वाडा परिसरातील शेवटचा रूग्ण घरी आल्याने हा परिसर कोरोना मुक्त झाला आहे. मंगळवारी त्याच्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.
दरम्यान अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने परिसर कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण व इतर कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. नागरिकांच्या वतीने नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी अधिकाºयांचा गौरव केला. पोलीस निरीक्षक राजेश सिंगते, डॉ.जगदीश मगरे यांचा ही सन्मान करण्यात आला.