गाडगेबाबा जयंतीनिमित्त मनरद येथे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:51+5:302021-02-24T04:32:51+5:30
या कार्यक्रमात जायन्ट्स फेडरेशनचे माणक चौधरी, कैलास भावसार, शहादा जायन्ट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेलीच्या अध्यक्ष दीपाली बाविस्कर, सचिव आशा ...

गाडगेबाबा जयंतीनिमित्त मनरद येथे कार्यक्रम
या कार्यक्रमात जायन्ट्स फेडरेशनचे माणक चौधरी, कैलास भावसार, शहादा जायन्ट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेलीच्या अध्यक्ष दीपाली बाविस्कर, सचिव आशा चौधरी, इस्माईल राजा, पोलूस पाटील नीलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुकेश पाटील, मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील मुलांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी माणक चौधरी म्हणाले की, गाडगेबाबा हे सच्चे समाजसेवक होते. त्यांनी जीवनभर गरीब, गरजू, दुःखी व निराश लोकांची सेवा केली. भूषण बाविस्कर म्हणाले की, शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते म्हणून कोरोना काळात घरीच वाचन व लिहिणे सुरू ठेवावे. म्हणून आपणास पेन, पेन्सिल, नोटबुक आदी साहित्य जायन्ट्स ग्रुपतर्फे देण्यात येत असल्याचे सांगितले. पोलीस पाटील नीलेश पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक दीपाली बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास भावसार तर आभार इस्माईल राजा यांनी मानले. कार्यक्रमासाठी के.के. सोनार, कविता सिसोदे, सुनीता निकुम आदींनी परिश्रम घेतले.