सव्वा लाखांचा दंड भरूनही तळोदेकरांना शिस्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:06 IST2020-05-10T12:06:03+5:302020-05-10T12:06:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तळोदा पोलिसांनी धडक मोहीम ...

Even after paying a fine of Rs 15 lakh, Talodekar was not disciplined | सव्वा लाखांचा दंड भरूनही तळोदेकरांना शिस्त लागेना

सव्वा लाखांचा दंड भरूनही तळोदेकरांना शिस्त लागेना

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तळोदा पोलिसांनी धडक मोहीम राबवून आठवडाभरात एक लाख १२ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड देऊनही तळोदेकरांना शिस्त लागत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीमाबंदी, संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जिल्हाधिकाºयांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर पोलिसांकडून आठवडाभरापासून दररोज कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला जात असून, दररोज मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे.
मागील आठवड्यात मास्क वापरणाºया २९ जणांवर केलेल्या कारवाईतून २९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याच्या १५७ केसेसमधून ७८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल झाला आहे. मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंग न राखणे अशा दोन्ही प्रकारच्या तीन केसेसमधून चार हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. २९ एप्रिल ते ८ मे दरम्यान एकूण १८९ केसेस नोंदवून पोलिसांनी आतापर्यंत एकूण एक लाख १२ हजार रूपयांचा दंड तळोदा शहरातून वसूल केला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई करून दंड वसूल केला जात असल्याने नागरिकांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन घडेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून संचारबंदीत शिथिलथा मिळाल्यानंतर तळोदा शहरात ठिकठिकाणी गर्दी जमून सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसून आला. मुख्य बाजारपेठेतही मेनरोड व स्मारक चौकात प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. मागील दीड महिन्यापासून बंद असणारी दुकाने सुरू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात पहायला मिळत आहेत. यातून अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होत असून त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांना हेरून पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत असले तरी अनेक जण पोलिसांना चकमा देत निसटतदेखील आहेत.
तळोदा शहरात अद्याप कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नसला तरी तिन्ही बाजूला असणाºया शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा शहरात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत, असे असताना तळोदा शहरात संचारबंदीबाबत गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक पायी व मोटारसायकलने घराबाहेर पडलेले पडलेले दिसून येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड देऊनही तळोदेकरांना शिस्त लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Even after paying a fine of Rs 15 lakh, Talodekar was not disciplined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.