नंदुरबार जिल्ह्यात मुदत संपूनही बोंड अळींचे पंचनामे संथच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:22 IST2018-01-05T12:21:57+5:302018-01-05T12:22:12+5:30

नंदुरबार जिल्ह्यात मुदत संपूनही बोंड अळींचे पंचनामे संथच
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 60 हजार हेक्टर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाले होत़े या कापसाचे पंचनामे करण्याची मुदत ही 31 डिसेंबर्पयत होती़ मात्र मुदत संपूनही अद्याप 27 हजार हेक्टवर पंचनामे होणे शिल्लक आहेत़ पंचनाम्यांबाबत शेतकरी नाराज आहेत़
रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर शासनाने बोंडअळीमुळे खराब झालेल्या कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होत़े यानुसार जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 1 लाख 18 हजारपैकी 60 हजार हेक्टर क्षेत्रात बोंडअळीचा पुरेपूर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले होत़े महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे सुरू करण्यात आले होत़े
या पंचनाम्यांची मुदत ही 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले होत़े मात्र जिल्ह्यात केवळ 33 हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे करण्यात आले आहेत़ उर्वरित 27 हजार हेक्टरवर पंचनामे अद्यापही अपूर्ण आहेत़ यासाठी तीन विभागाचे कर्मचारी सातत्याने फिरूनही पंचनामे पूर्ण होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े अनेक शेतक:यांनी पिक काढून फेकून दिल्याने पंचनामे होणार कसे, असा प्रश्न आह़े या शेतक:यांना शासनाने हेक्टरी भरपाई देण्याची आवश्यकता आह़े उशिराने पंचनामे सुरू करणा:या शासनाने कापूस काढून फेकणा:या बोंडअळीग्रस्त शेतक:यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी होत आह़े
शासनाकडून कोरडवाहू कापूस उत्पादकास बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपये, अशी एकूण 30 हजार 800 रुपये इतकी हेक्टरी मदत देण्याचे जाहिर केले आह़े तर बागायत कापूस उत्पादक शेतक:यांना एनडीआरएफमार्फत 13 हजार 500, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपये, अशी एकूण साधारण 37 हजार 500 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतक:यास देण्याचे जाहिर केले आह़े दोन हेक्टर्पयतच ही मदत देण्यात येणार आह़े ही मदत उत्पादनापेक्षा तोकडी असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े