प्रवासी महासंघाच्या शहादा तालुका शाखेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:17+5:302021-08-17T04:36:17+5:30

रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून ते विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रवासी महासंघ काम करतो. प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायतीशी ...

Establishment of Shahada taluka branch of Pravasi Mahasangh | प्रवासी महासंघाच्या शहादा तालुका शाखेची स्थापना

प्रवासी महासंघाच्या शहादा तालुका शाखेची स्थापना

रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून ते विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रवासी महासंघ काम करतो. प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायतीशी निगडित आहे. अन्नपूर्णा लाॅन येथे के.डी. गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष उदय निकुंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या शहादा तालुका शाखेची स्थापना होऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. शहादा तालुका प्रवासी महासंघाच्या पहिल्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सुनील सोमवंशी यांची तर सचिवपदी कवी अजबसिंग गिरासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील - संघटक प्रमोद सोनार, सहसंघटक दिलीप खेडकर, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र कलाल व प्रा. अनिल सोलंकी, सहसचिव श्रीकृष्ण सोनार, कोषाध्यक्ष प्रकाश शेळके, प्रसिद्धिप्रमुख हर्षल साळुंके, सदस्य अंबालाल पाटील, हर्षल पवार, के.डी. गिरासे, निमंत्रित सदस्य उदय निकुंभ व डाॅ राजेश सावळे, कायदेशीर सल्लागार प्रीतेशकुमार जैन

Web Title: Establishment of Shahada taluka branch of Pravasi Mahasangh