कोरोनाबाबत नियंत्रण कक्षांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:21 IST2020-03-25T14:21:20+5:302020-03-25T14:21:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबारा : कोरोनाबाबत नागरिकांच्या शंका-समस्यांचे समाधान आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

Establishment of Corona Control Room | कोरोनाबाबत नियंत्रण कक्षांची स्थापना

कोरोनाबाबत नियंत्रण कक्षांची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबारा : कोरोनाबाबत नागरिकांच्या शंका-समस्यांचे समाधान आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत़ यासोबतच तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़
जिल्हा नियंत्रण कक्षात ०२५६४-२१००६ या क्रमांकावर नागरिकांना कोरोनासंदर्भात तक्रारी किंवा सूचना करता येणार आहेत़ यासोबतच जिल्हा रुग्णालयातही नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे़ या ठिकाणी प्रशासनाने ०२५६४-२१०१३५ हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे़ नंदुरबार रेल्वेस्थानकातील संपर्क कक्षात ९००४४७१९४०, खांडबारा ०२२६७६४२३४८, नवापूर रेल्वे स्टेशन कक्षात ०२२६७६४२३५७ हे क्रमांक सुरु करण्यात आले आहेत़
प्रशासनाने जिल्हा परिषद आरोग्य कार्यालयातही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे़ यासाठी ९४२३३७८२७९ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे़ नागरिकांना कोरोनासंबधी असलेल्या माहितीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात ०२५६४-२१०११३ येथे संपर्क करता येणार आहे़ तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यांतर्गत शहादा येथे ०२५६५-२२४५००, ९४२०६२३६३४, तळोदा ०२५६७-२३२३६७, ९४०४३७५९७९, अक्कलकुवा ०२५६७-२५२२२६, ८००७०६८४१९, नवापूर ०२५६९-२५००४०, ८६०५७५५९५ तर नंदुरबार तालुकास्तरावर ०२५६४-२३२२६९, ८६०५९१६३४६ या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क करावयाचा आहे़ दरम्यान चुकीची आणि खोडसाळपणे माहिती फैैलावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे़ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नियंत्रण कक्षाकडून प्रत्येक घटना अथवा माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी कळवले आहे़

Web Title: Establishment of Corona Control Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.