शहादा येथे उपजिल्हा रुग्णालय उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:36+5:302021-05-12T04:31:36+5:30
निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका आहे. शहादा उपविभागात बहुतांश लोकसंख्या ग्रामीण ...

शहादा येथे उपजिल्हा रुग्णालय उभारा
निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका आहे. शहादा उपविभागात बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व मोलमजुरीवर उपजीविका करते. सध्या शहादा उपविभागात फक्त तीनच ग्रामीण रुग्णालये कार्यान्वित असल्याने रुग्णांची वणवण होते. वेळप्रसंगी या रुग्णालयातूनही नंदुरबार जिल्हा रुग्णालयात संदर्भसेवेसाठी केले जाते. ग्रामीण भागातील गरीब रुग्णाला तालुक्यातील खाजगी रुग्णालय परवडत नसल्याने, नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही. धडगाव ते नंदुरबार, तसेच शहादा ते नंदुरबार हे अंतर जास्त असल्याने वेळप्रसंगी रुग्ण रस्त्यातच दगावतो. कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती व आरोग्याविषयी इतर समस्यांचा विचार करता शहादा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळावी, अशी मागणी शहादा तालुकाध्यक्ष संतोष वळवी, उपाध्यक्ष संदीप रावताळे, सहसचिव भरत पवार आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.