भगवंताच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:09+5:302021-09-02T05:06:09+5:30
कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथील स्वामीनारायण मंदिरात श्रावणमासनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ. ...

भगवंताच्या नामस्मरणाने ऊर्जा मिळते
कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथील स्वामीनारायण मंदिरात श्रावणमासनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावीत, युवा नेत्या डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते महाअभिषेक व आरती सोहळा अशी विधिवत धार्मिक पूजा करण्यात आली. याप्रसंगी सदगव्हाण सरपंच प्रतिका मराठे, दोडेगुजर समाज संस्थानचे अध्यक्ष यशवंत पटेल, माजी अध्यक्ष डाया चौधरी, वृंदावन पटेल, माजी अध्यक्ष संजय चौधरी, पुणे येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, शहादा भारतीय जनता पक्षाचे वासुदेव पाटील, खापर येथील उद्योजक अजय सोनार, योगेश सोनवणे, विजय सोनार, योगेश सोनार, नगरपालिकेचे नगरसेवक, आदींसह सत्संगी भाविक उपस्थित होते.
डॉ. हिना गावीत पुढे म्हणाल्या की, स्वामीनारायण मंदिरात येऊन खूप प्रसन्नता वाटली आणि यामुळे मला विकासकामांसाठी अधिक ऊर्जा मिळाली. या छोट्याशा गावात काही वर्षांपूर्वी प्रमुख स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार केंद्रापासून सुरुवात झालेल्या स्वामींच्या मंदिराची भली मोठी वास्तू तयार झाली. त्यामुळे दोघेही राज्यातील भाविक जुळल्यामुळे गावागावांत संस्काररूपी विकास झाला. स्वामीनारायण मंदिर हे गुजरात व महाराष्ट्र सरहद्दीवर असल्याने महाराष्ट्रातील सत्संगी भाविक जुळल्यामुळे भगवंतांचे रोज नामस्मरण केल्यामुळे परिवारासह गावाचा विकास झाला.
प्रास्ताविकात मंदिराची व श्रावणमासनिमित्त झालेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती महेंद्र पटेल यांनी दिली. सूत्रसंचालन महेंद्र पटेल यांनी केले. आभार युवराज पटेल यांनी मानले. कार्यक्रमासाठी लक्ष्मण पटेल, कन्हैया पटेल, अशोक पटेल, भालचंद्र पटेल, रामेश्वर चौधरी, महेश्वर पटेल, किशोर पटेल, ईश्वर पटेल, आदींसह सत्संगी भाविकांनी परिश्रम घेतले.
महिला, युवतींनी केले अनोखे स्वागत
मंदिराच्या प्रांगणात महिला, युवती सत्संगी यांनी एकाच रंगाचा पेहराव घालत एका ओळीत उभे राहून डॉ.खा. हिना गावीत व डॉ. सुप्रिया गावीत यांच्यासह मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी सरपंच प्रतीका मराठे, गायत्री चौधरी, आशासेविका शीतल चौधरी, अमृता चौधरी, सपना पटेल, शीला पटेल, वैशाली पटेल, कविता पटेल, आदी उपस्थित होते.