रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:26+5:302021-09-02T05:05:26+5:30

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने मनरेगाअंतर्गत विविध यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ...

Employment available to laborers under Employment Guarantee Scheme | रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध

रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने मनरेगाअंतर्गत विविध यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. त्यानुसार काकरदा वनक्षेत्रांतर्गत डोंगराळ भागात सीसीटी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. निगदी गावातील ३९ अकुशल मजुरांना या कामामुळे रोजगार मिळाला आहे.

वनक्षेत्रपाल अभिजित पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीचे काम १७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत २४८ मनुष्यदिवस निर्माण झाले आहेत, तर कामावर ५८ हजार रुपये खर्च झाला आहे. १० मीटर लांब आणि दीड फूट रुंद सीसीटी तयार करण्यात येत असल्याने जलसंधारणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना काम देण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर यंत्रणानिहाय कामांचे नियोजन केले असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनी काम मिळविण्यासाठी गावातील ग्रामरोजगार सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे यांनी केले आहे.

Web Title: Employment available to laborers under Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.