कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:45 PM2018-08-14T12:45:32+5:302018-08-14T12:45:37+5:30

अटल विश्वकर्मा अभियान : जिल्ह्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्यात येताय अडचणी

Employees Regarding Workers Registry | कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

Next

नंदुरबार : अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आह़े अभियांनातर्गत 10 हजार कामगार नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात  आले आह़े परंतु प्रत्यक्षात 4 हजार 663 इतक्याच कामगारांची नोंद झाली आह़े उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े
राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े यासाठी संबंधित विभागाकडून धुळे व नंदुबार या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजार कामगार नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े परंतु प्रत्यक्षात जेमतेम कामगार नोंदणी होत असल्याचे लक्षात आल्यावर 4 ऑगस्टची मुदत वाढवून ती 14 ऑगस्ट करण्यात आलेली होती़ अभियानाचे दहा दिवस वाढवल्यावरसुध्दा नंदुरबारातील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा:यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात 13 ऑगस्टर्पयत एकूण 4 हजार 663 कामगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे अवघ्या काही दिवसात जास्तीत जास्त 500 मजुरांची नोंद केली तरी निम्मेच टार्गेट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचा:यांना शक्य होणार असल्याची यातून दिसून येत आह़े 
4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े संबंधित कामगारांमध्ये बांधकामकामगार, दगड कामगार, फरशी कामगार,  पेंटर, सुतार कामगार, यांत्रिकीकरणाशी संबंधित कामगार, नाले बांधकाम करणारे कामगार, प्लम्बिंग कामगार, अग्निशमन यंत्राची निर्मिती करणारे कामगार, सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणारे कामगार, सौर ऊज्रेशी संबंधित कामगार आदी कामगारांचा यात समावेश होतो़ नोंदणी करून घेण्यासाठी कामगारांजवळ वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हव़े शिवाय, रहिवासी दाखला, फोटो असलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज तीन फोटो आदींची गरज आह़ेअभियान राबविण्यासाठी संबंधित अधिका:यांना ठिकठिकाणी फिरावे लागत आह़े त्यामुळे या फिरत्या पथकासाठी शासनाकडून संबंधितांना मोबाईल व्हॅन देण्यात आली आह़े अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात कामगार नोंदणी अभियान राबवले जात आह़े
 

Web Title: Employees Regarding Workers Registry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.