कुकडेल येथे महावितरणच्या कर्मचा:यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:14 IST2018-04-12T13:14:27+5:302018-04-12T13:14:27+5:30

तिघांविरुध्द गुन्हा : गंभीर जखमी

The employees of the MSEDCL at Kukdeel | कुकडेल येथे महावितरणच्या कर्मचा:यांना मारहाण

कुकडेल येथे महावितरणच्या कर्मचा:यांना मारहाण

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : शहादा तालुक्यातील कुकडेल येथे विजेची बिल वितरीत करण्यासाठी गेलेल्या विद्युत सहाय्यक निलेश माळी व तुषार क:हाडे यांना मारहाण करण्यात आली़ 
याबाबत आरोपी जालीस अफ्फान अन्सारी, इक्बाल अफ्फान अन्सारी व नाफीस फारुख अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
सविस्तर माहिती अशी की, महावितरणच्या शहादा शहर कक्षात विद्युत सहाय्यक असलेले निलेश बन्सीलाल माळी व त्यांचे सहकारी तुषार क:हाडे हे विज बिलांच्या वितरणासाठी शहादा तालुक्यातील कुकडेल परिसरात गेले होत़े या वेळी जालीस अफ्फान अन्सारी यांचे मार्च महिन्याचे बिल देत असताना इक्बाल  अफ्फान अन्सारी व नाफीस फारुख अन्सारी यांनी विनाकारण हुज्जत घालत शिवीगाळ करुन मारहान  केली़
 या वेळी तुषार क:हाडे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही या वेळी मारहाण करण्यात आली़ जिवेमारण्याची धमकीही देण्यात आली़
 निलेश माळी व तुषार क:हाडे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
 

Web Title: The employees of the MSEDCL at Kukdeel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.