आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुटी देण्याची कर्मचारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:32+5:302021-05-28T04:23:32+5:30
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्यांपासून साप्ताहिक व इतर शासकीय सुटी मिळत नाही. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुटी देण्याची कर्मचारी महासंघाची मागणी
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्यांपासून साप्ताहिक व इतर शासकीय सुटी मिळत नाही. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात, आरोग्य कर्मचाऱ्यांना रविवारची साप्ताहिक सुटी व इतर शासकीय सुटी देण्यात याव्यात. सुटीच्या दिवशी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पर्यायी बदली सुटी देण्यात यावी. जनतेला सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहणे, तो ताण-तणावरहित असणे आवश्यक आहे. सुटी ही कायद्याला व नियमाला धरून असली तरी मानवतेच्या दृष्टिकोनातूनही कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणे आवश्यक आहे. नवापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट व रॅपिड अँटिजेन टेस्टच्या टार्गेटची सक्ती केली जात आहे. ही सक्ती नसावी. कारण राज्यात कुठल्याही जिल्ह्यात अथवा तालुक्यात अश्या प्रकारची सक्ती केली जात नाही. संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना टेस्ट सेंटरपर्यंत आणण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार नाहीत. संबंधित व्यक्ती स्वतःहून स्वॅब देण्यासाठी न आल्यास त्यांच्यावर काही कायदेशीर कार्यवाही झाल्याचे समजलेले नसल्याचे म्हटले आहे.