भूषा येथे नर्मदा नदीकिनारी पोलिसांकडून सुरक्षा उपायांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:56 IST2020-01-13T11:56:03+5:302020-01-13T11:56:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : धडगाव तालुक्यातील भूषा येथे गेल्या वर्षी मकर संक्रातीला बोेट उलटून सात जणांचा मृत्यू झाला ...

 Emphasis on security measures by Narmada river police at Bhusha | भूषा येथे नर्मदा नदीकिनारी पोलिसांकडून सुरक्षा उपायांवर भर

भूषा येथे नर्मदा नदीकिनारी पोलिसांकडून सुरक्षा उपायांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : धडगाव तालुक्यातील भूषा येथे गेल्या वर्षी मकर संक्रातीला बोेट उलटून सात जणांचा मृत्यू झाला होता़ या घटनेच्या पार्श्वभूमीव यंदा याठिकाणी पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जात आह़े़ यानिमित्त येथे पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेट देऊन पाहणी केली़
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या सूचनेनुसार याठिकाणी विविध उपाययोजना करण्यासह भूषा आणि खर्डी ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छताही करण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने येणाऱ्या हजारो भाविकांसाठी बॅरिकेटींग करण्यात आले आहे़ दरवर्षी मकर संक्रांतीला भूषा येथे नर्मदा नदीत स्रान करण्यासाठी दुर्गम व अती दुर्गम भागातील आदिवासी बांधव हजेरी देतात़ अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी विविध सुविधा अपुºया पडू लागल्या आहेत़ गेल्या वर्षी संक्रातीनिमित्त याठिकाणी नर्मदेचे जलपूजन करण्यासाठी बोटमध्ये बसून दुसºया किनाºयावर जाणाºया भाविकांचा अपघात झाला होता़ बोट उलटून तब्बल बालिका आणि महिलेचा मृत्यू झाला होता़ तसेच इतर अनेक जण जखमी झाले होते़ या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे़
रविवारी पोलीस उपअधिक्षक सपकाळे यांनी भूषा येथे भेट देऊन पट्टीचे पोहणारे तसेच ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा करुन बोटी, उपलब्ध साधने यांची माहिती घेतली़ पोलीसांकडून उभारले जाणारे माहिती कक्ष, भाविकांसाठीच्या सोयी, रस्ते, पार्किंग यांची माहिती घेतली़ याठिकाणी किमान ५० हजारापेक्षा अधिक नागरिक येणार असल्याची शक्यता असल्याने पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना आखल्या जाणार आहेत़ सोबतच महसूल प्रशासनही येथे कर्मचारी नियुक्त करणार आहे़ आरोग्य विभागाच्या बोटींची याठिकाणी नियुक्ती होणार आहे़ यातून भाविकांसाठी फिरत्या आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाची पथके याठिकाणी १५ जानेवारी तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title:  Emphasis on security measures by Narmada river police at Bhusha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.