आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर- ॲड.के.सी.पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:46+5:302021-07-25T04:25:46+5:30
खापर येथे आयोजित खावटी किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा ...

आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर- ॲड.के.सी.पाडवी
खापर येथे आयोजित खावटी किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, दिलीप नाईक, ॲड.गोवाल पाडवी, प्रताप वसावे आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, खावटी योजनेचा लाभ देणे हा तात्पुरता दिलासा आहे. आदिवासी बांधवांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. विभागामार्फत आदिवासी बांधवांना रोजगारासाठीच्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते खापर आणि ब्राह्मणगाव येथील एकूण ६०६ लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात खावटी किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी वळवी, नाईक आणि वसावे यांनीही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते खापर आणि ब्राह्मणगाव येथील एकूण ६०६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात खावटी किटचे वाटप करण्यात आले.